Feedback Contact Us
 
YOU ARE HERE :   मुखपृष्ठ   »   संस्था - भारत विद्यालय - शैक्षणिक
 
 
 
   
भा.शि.प्र.मं. संस्था
शैक्षणिक @ भारत विद्यालय
आज शाळेतील विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्या अंतर्गत MTS, NTS, NMMS, Resovista, RaoTIT, Dr. Homi Bhabha Maths Genius, Maths Olympiad, Eklavya Dnyanvardhini टिळक विद्यापीठ या सारख्या स्पर्धा परिक्षांमधेही शाळेतील विद्यार्थी घवघवित यश संपादन करीत आहेत. "विद्यार्थी विकास" हीच मध्यवर्ति संकल्पना डो्ळ्यासमोर ठेवुन शाळेतर्फे आजही दहावीच्या विद्यार्थांकरिता Tutorials, Quality Development Program, Group Study यासारखे दर्जेदार उपक्रम राबविले जात असुन त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.

या उपक्रमांच्या यशस्वीतेकरीता शाळेच्या संचालक मंडळाच मोलाच हात आहे. याचाच एक भाग म्हणुन संचालक मंडळ शिक्षकांकरीता  विविध कार्यशाळा आयोजित करीत असतात त्यापैकी उल्लेखनिय श्री. शाम भुरके, श्री. स्वामी चिन्मयानंद, श्री. अरविंद गोरे, श्रीमती रेणु दांडेकर अशा मान्यवरांनी घेतलेल्या कार्यशाळा ह्या उल्लेख़नीय होत्या, तसेच शिक्षकांना नविन तंत्रज्ञान अवगत व्हावे या उद्देशानी सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांसाठी MS-CIT Training Programme राबविला. त्यासोबतच शाळेतील अधिकारी वर्गाचे शिस्तबद्ध नियोजन, नवसंकल्पना साकरण्याचे कौशल्य त्याकरिता लागणारी तळमळ व प्रभावी अंमलबजावणी यामुळेच भारत विद्यालय सतत प्रगती पथावर आहे. आज विद्या्र्थांमधे जिज्ञासु वृत्ती, वैज्ञानिक दृष्टीकोन, पर्यावरण संवर्धनाचे महत्व, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता शाळेमध्ये विज्ञान, गणित, भुगोल प्रदर्शनी व हस्तकला प्रदर्शनी आयोजित करण्यात येते.

वरील उपक्रमांमुळे भारत विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे त्यात शंका नाही.

Go to Top