Feedback Contact Us
 
YOU ARE HERE :   मुखपृष्ठ   »  भा शि प्र मं विषयी - आमच्या विषयी
 
 
 
   
भा.शि.प्र.मं. विषयी
भारत शिक्षण प्रसारक मंडळा विषयी
भारत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना अकोला शहराचा विस्तार व शैक्षणिक संस्थांची कमतरता लक्षात घेउन १९६३ साली स्व. श्री दादासाहेब मोर्शीकर यांचे नेतृत्वाखाली ११ संस्थापक संचालकांनी केली.
संस्थापक सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे
 
कै. श्री. लक्ष्मण अमृत उर्फ पंत देशमुख,
 
श्री. वासुदेव सदाशिवराव मनभेकर,
 
श्री. नारायणराव बाबुराव तोंडुलकर,
 
कै. कृष्णराव माधवराव बक्षी,
 
कै. गणेश मनोहर उर्फ दादासाहेब मोर्शीकर,
 
श्री. मधुसूदन अच्युतराव पसारकर,
 
श्री. पांडुरंग रामचंद्र उर्फ बाजीराव वझे,
 
कै. मांगीलालजी शर्मा,
 
कै. नवनितलालजी मेहता,
 
कै. वासुदेव दत्तात्रय चिपळुणकर,
 
कै. वामन व्यंकटेश गडकरी.
श्री दादासाहेब मोर्शीकरांचा नेतृत्वाखाली १९६९ साली तापडीया नगर व संलग्न भागातील विद्यार्थींच्या गरजा लक्षात घेउन भारत विद्यालयाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात श्री मनभेकर यांच्या घराच्या प्रांगणात वर्ग चालविण्यासाठी त्यांनी जागा उपलब्ध करुन दिली. कच्च्या खोल्यांचे वर्ग असलेली शाळा श्री. दादासाहेब मोर्शीकर यांच्या नेतृ्त्वाखाली चालविल्यानंतर १९६९ आपल्या भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वतःच्या जागेत वास्तु निर्माण करुन त्यामध्ये शाळेचे स्थानांतरण करण्यात आले. त्यानंतर सातत्याने शाळेचे विस्तारीकरण होत भारत विद्यालय हा मोठा वृ्क्षारुपात स्थानांतरीत झाला असुन त्यामध्ये जवळपास १७०० विद्यार्थ्यांना वर्ग ५ ते १० मध्ये उत्कृ्ष्ठ शिक्षण देण्यात येते. संस्थेने २००१ साली जेव्हा प्रामुख्याने कनिष्ठ महाविद्यालयाची आवश्यकता जाणवली तेव्हा ना. के. गोखले कनिष्ट महविद्यालयाची स्थापना २००१ साली करण्यात आली. आज ना. के. गोखले क. महाविद्यालयामध्ये जवळपास ४०० विद्या्र्थीना General Science, Information Technology, Computer Science, F.W.F.C. ई चे दर्जेदार शिक्षण पुरविण्यात येत आहे. 

                               भारत शिक्षण प्रसारक मंडळानी ई. स. २००३ साली इंग्रजी माध्यामामध्ये विद्या्र्थ्यांना नर्सरी ते १२वी पर्यंत शिक्षण उपलब्ध करण्यासाठी बेरार जनरल एज्युकेशनतील शाळा "विवेकानंद प्रायमरी इं शाळा" भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वास्तुत स्थानांतरीत करुन त्यांचे व्यवस्थापन आपल्या हाती घेतले. आज जवळपास १००० विद्यार्थींना विवेकानंद प्रा. इ. स्कुल मध्ये इंग्रजी माध्यामामधुन शिक्षण पुरविण्यात येते.
Go to Top