Feedback Contact Us
 
YOU ARE HERE :   मुखपृष्ठ   »   संस्था - भारत विद्यालय
 
 
 
   
भा.शि.प्र.मं. संस्था
भारत विद्यालयाविषयी

१९६४ साली लावलं गेलेलं एक छोटसं रोपं, त्याचं वटवृक्षात झालेलं रुपांतर, असा हा पन्नास वर्षांचा सुवर्णाकाळ.

काही ध्येयवेडया लोकांनी एकत्र येउन उदात्त विचारांनी एका छोट्याश्या खोलीमध्ये शाळेची सुरुवात केली. शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचावी व प्रत्येक मुला्ने या ज्ञानरुपी गंगेत यथेच्छ स्नान करावे, हीच ह्यामागील मनस्वी सदिच्छा! या एकाच ध्यसाने त्यांनी विद्यार्थी जमविले, वेळ्प्रसंगी पदरचा पैसा वेतन म्हणुन दिला. लाखांच्या घरात देणगी घेणार्‍या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये भारत विद्यालयाचे वेगळेपण जपले गेले ते आज पर्यन्त.

संस्थापक अध्यक्ष कै. श्री. पंत देशमुख, शाळेसाठी तन, मन, धनानी झिजणारे कै. दादासाहेब मोर्शिकर व त्यांच्या इतर सह्कार्‍यांनी एकत्र येउन लावलेले हे रोप. अर्थात वृ्क्ष लावणारा कधीच त्याची फळं चाखत नसतो, त्याचा आस्वाद घेणारी पुढची पिढीच असते. ह्याच न्यायाने आज या व्रुक्षाची ही रसभरीत फळं आज शाळेत कार्यरत व शाळेतून मागील १० वर्षात निवृ्त्त झालेल्या शिक्षकांची आहेत व चाखत आहेत, हे सर्वांचे अहोभाग्यच.

शाळेची स्थापना करण्यापासून शाळा उर्जितावस्थेला आणण्यापर्यंत ज्यांनी हे शिवधनुष्यं पेललं असे संचालक मंडळ...

 
कै. श्री. लक्ष्मण अमृ्त उर्फ पंत देशमुख,
श्री. वासुदेव सादशिवराव मनभेकर,
श्री. नारयणराव बाबुराव तोंडुलकर,
कै. कृष्णराव माधवराव बक्षी,
कै. गणेश मनोहर उर्फ दादासाहेब मोर्शीकर,
श्री. मधुसूदन अच्युतराव पसारकर,
श्री. पांडुरंग रामचंद्र उर्फ बाजीराव वझे,
कै. मांगीलालजी शर्मा,
कै. नवनितलालजी मेहता,
कै. वासुदेव दत्तात्रय चिपळुणकर,
कै. वामन व्यंकटेश गडकरी.
शाळा हे एक कुटूंब असते, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि व्यवस्थापन यांना जोडणारा प्रमुख दुवा म्हणजे मुख्याध्यापक. शाळेच्या कार्याकर्तृ्त्वात चार चांद लावणारे शाळेचे मुख्याध्यापक...
 
क्र.
मुख्याध्यापक
कार्यकाळ 
 १
श्री. ग. म. मोर्शिकर
१९६४ ते १९६९
श्री. के. कृ. जोशी
१९६९ ते १९७३
सौ. शा. अ. अभ्यंकर
१९७३ ते १९९१
श्री. प्र. त्रं. महानकर
१९९१ ते २००३
श्री. मु. अ. कावळे
०१/०८/२००३ ते ३१/१२/२००३
श्री. य. श्री. देशपांडे
०१/०१/२००४ ते ३०/०४/२००८
श्री. आ. वि. दुर्गे
०१/०५/२००८ ते २८/०२/२००९
श्री. वि. मा. देसाई
०१/०३/२००९ ते ३१/१०/२००९
सौ. म. र. अभ्यंकर
०१/११/२००९ पासून आजपर्यन्त
विद्यार्थ्यांचा प्रथमगुरु म्हणजे आई अन घराबाहेर शाळा व शिक्षक हे त्यांचे प्रथम गुरु असतात. 'विद्यादानम् सर्वदानम् प्रधानम्' या संस्कृ्त वचनाप्रमाणे येथील शिक्षक कुठल्याहस मोबदल्याची अपेक्षा न ठेवता आपले कार्य तळमळीने करत असतात. ही शाळेची जमेची बाब. अर्थात शाळेची इतर कामे ही सुद्धा तेवढीच महत्वाची. यासाठी तेवढेच मोलाचे योगदान शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे सुद्धा आहेच. बदल हा जीवनाचा स्थायी्भाव आणि म्हणुनच बदलत्या काळानुसार व गरजेनुसार शाळेची विस्तीर्ण इमारत आज दिमाखात उभी आहे. काळानुरुप तंत्र ज्ञान आत्मसात करण्यात आले आहे व त्यानुसार ११ वी व १२ वीचे वर्ग व इंग्रजी माध्यमाची शाळा ही बदलत्या काळाची गरज म्हणून ना के गोखले विज्ञान महाविद्यालय व विवेकानंद इंग्रजी माध्यमिक शाळा आज दिमाखात वाटचाल करित आहेत. प्रशस्त खोल्या, विस्तीर्ण मैदान, संगणकीकृत वर्गखोल्या या सर्वच गोष्टींचा परिपाक म्हणजे शाळेचा दरवर्षी लागणारा उत्कृष्ट निकाल. माध्यमिक व उच्च मध्यमिक शाळामधुन प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांची संख्या वाढतीच आहे, उत्कृ्ष्ठ निकालासाठी राबवले जाणारे टयुटोरियल व ग्रुप स्टडी ही शाळेची खास वैशिष्ट.

शाळेला भेट देणार्‍या मान्यवर, आदरणिय व्यक्तीमत्वांमध्ये मा श्री राजेद्रजी दर्डा - माजी शिक्षणमंत्री (महाराष्ट्र), श्री विश्वनाथजी कराड -संस्थापक अध्यक्ष, एम आय टी,पुणे, श्री रविप्रकाशजी दाणी - कुलगुरु पं कृ वि अकोला. शाळेच्या दहावीच्या पहिल्या बचचे वि्द्यार्थी, श्री देवव्रत जातेगावंकर आंतरराष्ट्रिय शेफ, श्री चेतनजी चौहान- आंतरराष्ट्रिय ख्यातीचे क्रिकेटपटु, श्री नरेशचंद्र कठाळे - सनदी परिक्षांचे मार्गदर्शक यांच्या भेटीने व अलौकिक मार्गदर्शनाने शाळेच्या किर्तित भरच पडली आहे.
शाळेच्या य दैदिप्यमान यशामधे कित्येकांनी मोलाचा तर बर्‍याच जणांनी खारीचा वाटा उचलला, अशा सर्वांचाच नामोल्लेख येथे शक्य नाही पण अनुल्लेखित ठेवणे ही स्वार्थिपणाचेच ठरेल. अशा सर्वांचीच शाळ मनःपूर्वक आभारी आहे.

इवल्याश्या रोपट्याचे आज वटवृ्क्षात झालेले रुपांतर पाहुन त्याच्या सावलीत मन शांत, तृप्त होते. भविष्यात ही हा वटवृ्क्ष असाच बहरत राहो, पेक्षा कल्पवृ्क्ष होवो हीच आम्हा सर्वांची सदिच्छा.

'यावच्चंद्र दिवाकरौ ' असाच शाळेचा नावलौकिक राहो व 'स्वयंमेव मृ्गेन्द्रता' हे तत्व नित्यनेमाने ह्रुदयात जपले जावा ही ईश्वर चरणी प्रार्थना.

Go to Top