ज्ञानाच्या नवीन संकल्पना, संस्कारक्षम पिढी व उत्तमतेचा ध्यास मनाशी बाळगून १९६४ साली स्व. दादासाहेब मोर्शिकर यांनी भारत विद्यालयाची स्थापना केली
होती आणि कालापरत्वे या इवल्याशा रोपट्याचे वटवृ्क्षात रुपांतर कधी झाले ते कळलेच नाही. शाळेच्या या प्रगतीमध्ये सर्वांचेच योगदान उल्लेखनिय आहे म्हणुनच उत्तम शिक्षक आणि भरत विद्यालय ही भिन्न रुपे नसुन हे एकरुप आहेत
व या समीकरणाला कुठेच तोड नाही. एकंदरीत भारत वि्द्यालयाच्या प्रगतीचा आलेख बघितल्यास ही गोष्ट पटते.
१९६७ पासुन सुरु झालेली मेरिटची परंपरा आजपर्यंत कायम असुन दिवसेंदिवस त्यात गुणवत्तेची भरच पडते आहे म्हणुनच आज भारत विद्यालयाचे नांव सर्वतोमुखि आहे. सुरुवातीच्य काळात गु्णवत्ता यादीत येणार्यांची नावे परिक्षा मंडळाकडुन प्रसिद्ध केल्या जात असत. तेव्हापासुन आजपावेतो भारत विद्यालयाचे वि्द्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. २००५ नंतर जरी बो्र्डाने गुणवत्ता यादी जाहीर करण्याची पद्धत बंद केली असली तरीही
९ टक्केच्यावर गुण प्राप्त करणारे विद्यार्थी हे मेरिटच गृ्हीत धरले जात आहेत.